Tue, Sep 25, 2018 08:50होमपेज › Goa › अल्पवयीन मुलीस पळवण्याचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीस पळवण्याचा प्रयत्न

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMदाबोळी : प्रतिनिधी

वास्को येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या उत्तम कुमार बिद (वय 42) याला लोकांनी बेदम चोप देऊन वास्को पोलिसांच्या हवाली केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सडा येथील एक रहिवासी आपल्या मुलीला घेऊन वास्कोतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्याच्या खांद्यावर असलेल्या मुलीला बिदने ओढून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीच्या पालकाने त्याला प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या गळ्याला हात घातला व पुन्हा तिला ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सदर मुलीच्या पालकाने वेळ न दवडता त्याला पकडून बेदम चोप दिला. यावेळी जवळपास असलेले लोक जमा झाले व त्यांनीही त्याला बेदम चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले. पोलिस शिपाई सचिन बांदेकर व अजित परब यांनी संशयिताला ताब्यात घेतले. वास्को पोलिस पुढील तपास करीत आहेत.