होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांवर अमेरिकेतच उपचार

मुख्यमंत्र्यांवर अमेरिकेतच उपचार

Published On: Mar 15 2018 1:55AM | Last Updated: Mar 15 2018 1:35AMपणजी : प्रतिनिधी

अमेरिकेत खासगी इस्पितळात  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर योग्य उपचार सुरू असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, पर्रीकर पुन्हा मुंबईत लीलावती इस्पितळात परतणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत असून, ती अफवा असून, ती निराधार व खोटी असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून रुपेश कामत यांनी दिली.  

मुख्यमंत्री पर्रीकर यांना स्वादूपिंडाचा क्षार (पॅनक्रियाटिक सीस्टस्) आजार असल्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेतील अव्वल दर्जाच्या ‘मेमोरियल स्लोन केटेरिंग सेंटर’ (एमएसके) या इस्पितळात  उपचार सुरू आहेत.पर्रीकर  गेल्या बुधवारी (7 मार्च) संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईहून न्यूयॉर्कला पोहोचले असून, बुधवारी रात्रीच ते या इस्पितळात दाखल झाले आहेत.