Fri, Jul 19, 2019 07:16होमपेज › Goa › ट्रॅव्हल्स चालकांकडून बस तिकीट दरात वाढ  

ट्रॅव्हल्स चालकांकडून बस तिकीट दरात वाढ  

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:11AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

नववर्ष अवघ्या 5 दिवसांवर येऊन ठेपल्याने 2018 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सध्या देशी पर्यटकांचा गोव्याकडे ओघ वाढला आहे. या संधीचा लाभ उठवण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी बसच्या तिकीट दरात भरमसाठ वाढ केली आहे.

मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळूर येथून  येणारे पर्यटक जास्त दर देऊन नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी  गोव्यात येत आहेत. बंगळूरहून गोव्याला येण्यासाठी काही खासगी बसवाले अडीच हजार रुपयांपर्यंत तिकीट दर आकारत आहेत.

तिकिटांसाठीची वाढती मागणी लक्षात घेता खासगी बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. खासगी बससेवेची तिकिटे विकणार्‍या एजंटने दिलेल्या माहितीनुसार, 30 रोजी  मुंबईहून  गोव्याला येण्यासाठी  खासगी  बसेसकडून  नॉन एसी बसचे तिकीट 1500  ते 1800 रुपये प्रतिव्यक्ती, तर  व्होल्वो एसी बसचे तिकीट दर 2,500 ते  2,700 रुपयांपर्यंत आकारले जात आहे.

याशिवाय  बेंगळूरहून  गोव्याला येण्यासाठी नॉन एसी बसचे तिकीट  1800 रुपये तर व्होल्वो एसी बसचे तिकीट दर 2,400 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरात आणखी  वाढ अपेक्षित असल्याचे त्यांनी  सांगितले.