Wed, Sep 19, 2018 14:29होमपेज › Goa › वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 1:54AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

वाहतूक नियमांच्या उल्‍लंघनाबाबत  सरकार गंभीर असून वारंवार वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करणार्‍यांसाठी खास प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत शून्य तासावेळी सांगितले.

आमदार प्रतापसिंह राणे यांनी राज्यातील रस्ता अपघातासंदर्भात, वाहतूक खात्याने (आरटीओ) गंभीरपणे पावले उचलावीत, या मागणीला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

पर्रीकर म्हणाले, राज्यातील वाहनांची संख्या वाढली आहे. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त  वाहतुकीविरोधात कारवाई केली जात आहे. त्यानुसार,   गेल्यावर्षी 3.63 लाख जणांना दंड ठोठावण्यात आला होता. यावर्षी 4.69 लाख जणांना दंड ठोठावण्यात आला.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दंड ठोठावण्यात आलेल्या वाहन चालकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदा  रस्ता अपघातात ठार होणार्‍यांच्या संख्येत किंचीत घट झाली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा निम्म्यावर येणे अपेक्षित आहे. वाहतूक खात्याकडून वाहतूक नियमांंचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.