Wed, Mar 27, 2019 06:54होमपेज › Goa › अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विस्ताराचा आराखडा : मनोहर पर्रीकर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन विस्ताराचा आराखडा : मनोहर पर्रीकर

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 14 2018 11:52PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात पर्यटकांचा ओघ वाढत असून येत्या दोन वर्षात हा आकडा एक कोटी पार करणार आहे.  राज्यातील पर्यटन व्यवसायाचा विस्तार अंतर्गत भागांमध्ये करण्यासाठी आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात आराखडा मांडणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

पर्रीकर म्हणाले, की सध्या गोव्यात ज्या साधनसुविधा आहेत, त्या पाहता 70 ते 80 लाख पर्यटकांचा भार सध्या गोवा पेलू शकतो. मात्र तिसरा मांडवी पुल, नवा जुवारी पूल, पत्रादेवी ते पोळे महामार्ग, रस्ते रूंदीकरण अशा अनेक आधुनिक साधनसुविधा उभ्या राहिल्यानंतर एक कोटी पर्यटकांना गोवा सामावून घेऊ शकेल. एका खनिज व्यवसायावर आम्ही अवलंबून राहू शकत नाही किंवा केवळ पर्यटनावरच सुद्धा अवलंबून राहू शकत नाही. पर्यटन व्यवसाय अंतर्गत भागांमध्ये विस्तारायला हवा. येत्या अर्थसंकल्पात पर्यटनाच्या विस्ताराविषयी आपण सविस्तर भाष्य करणार आहोत, असेही पर्रीकर यांनी सांगितले.