Sun, Mar 24, 2019 16:46होमपेज › Goa › स्वदेश दर्शन अंतर्गत केंद्राकडून २०० कोटींचा निधी : पर्यटनमंत्री

स्वदेश दर्शन अंतर्गत केंद्राकडून २०० कोटींचा निधी : पर्यटनमंत्री

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:27AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

स्वदेश दर्शन अंतर्गत  गोवा पर्यटन खात्यास 200 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी विधानसभेत प्रश्‍नोत्तर तासावेळी दिली.

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी राज्यातील पर्यटन प्रकल्पांना केंद्रीय निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे का, असा प्रश्‍न विचारला. या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. 

आजगावकर म्हणाले, केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत राज्यातील विविध पर्यटन प्रकल्पांना केंद्र सरकारकडून निधी मंजूर केला आहे. स्वदेश दर्शनच्या पहिल्या टप्प्यात 99.98 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 49.54 कोटी रुपये दिले आहेत. स्वदेश दर्शनच्या दुसर्‍या टप्प्यात 99.35 कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी 19.82 कोटी रुपये दिले आहेत. स्वदेश दर्शन अंतर्गत 1.37 कोटी रुपये खर्चून जीआयएस  (जिओग्राफिक इनफॉर्मेशन सिस्टीम) मॅपिंग केले जाईल. याअंर्गत राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, पोलिस स्थानकांची माहिती आता मोबाईलच्या एका क्‍लिकवर उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. आ. सोपटे म्हणाले, मांद्रे मतदारसंघात पर्यटन खात्याकडून सात प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, प्रत्यक्षात यापैकी केवळ चारच प्रकल्पांची माहिती खात्याकडून देण्यात आली आहे. येथे 2.23 कोटी  रुपयांचा पर्यटन प्रकल्प मंजूर केला होता. मात्र, या प्रकल्पाचा फलक लावण्याखेरीज त्याचे काम अजूनही सुरू झाले नसल्याचा आरोप सोपटे यांनी केला.