Thu, Jul 18, 2019 06:42होमपेज › Goa › मंदिरांमुळे धार्मिक परंपरा टिकून 

मंदिरांमुळे धार्मिक परंपरा टिकून 

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:22AM

बुकमार्क करा

एकोशी : वार्ताहर

गावागावांतील मंदिरांमुळे आपली धार्मिक परंपरा आणि संस्कृती टिकून राहते. देवस्थानाला भेडसावणार्‍या समस्या पर्यटन खात्यातर्फे  सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केले.

पेडणे तालुक्यातील हळर्ण  येथील  वेताळ देवस्थानच्या 108 व्या जत्रोत्सवाच्या कार्यक्रमात पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर बोलत होते. पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या हस्ते यावेळी गुणवंत विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर सरपंच हर्षदा परब, वेताळ देवस्थानचे अध्यक्ष दत्तदास हळर्णकर, उद्योजक राजेश तारकर हळर्णकर, विश्‍वनाथ हळर्णकर, पंचायत सदस्य झिलू हळर्णकर, बबन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

देवस्थानचे अध्यक्ष दत्तदास हळर्णकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. देवस्थानाच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका 2018 व आरती संग्रहाचे प्रकाशन मंत्री  आजगावकरांच्या हस्ते झाले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थी दिप्ती हळर्णकर, मंथन हळर्णकर, पूजा हळर्णकर, तनुश्री हळर्णकर, गौरीश हळर्णकर, सिध्दी हळर्णकर, प्रती हळर्णकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

त्यानंतर विश्‍वनाथ हळर्णकर, शाबी हळर्णकर, नारायण  हळर्णकर, सुशिला हळर्णकर, सुंदर सावंत, सोनिया हळर्णकर व बाबी हळर्णकर यांचा शाल, श्रीफळ व श्री देव वेताळाची प्रतिमा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

राजेश तारकर हळर्णकर यांंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन देवानंद हळर्णकर यांनी केले. आभार देवस्थानचे वामन तारी हळर्णकर यांनी मानले. अक्षय नाईक यांचा ‘नक्षत्रांचे देणे’ हा संगीताचा कार्यक्रम झाला. दिवजोत्सव व दशावतारी नाटक दही हंडी कार्यक्रमाने धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.