Wed, Nov 21, 2018 06:11होमपेज › Goa › गोंयच्या सायबाचे आज फेस्त

गोंयच्या सायबाचे आज फेस्त

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 04 2017 12:15AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सेंट फ्रान्सिस झेवियर म्हणजेच  गोंयच्या सायबाच्या सोमवारी 4  डिसेंबर रोजी जुने गोवे येथे होणार्‍या फेस्तसाठी दीड लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे, अशी माहिती चर्चच्या सूत्रांनी दिली.

मोठ्या संख्येने देश-विदेशातील भाविक सेंट झेवियरचे दर्शन घेण्यासाठी  जुने गोवेत दाखल होत आहेत. सेंट झेवियर फेस्तासाठी 25 नोव्हेंबरपासून नोव्हेना सुरवात झालेली आहे. रविवार असल्याने चर्च परिसरात सुरू असलेल्या प्रार्थना सभांना भाविकांची गर्दी उसळली होती. 9 दिवस सुरू असलेल्या नोव्हेनांमध्ये धर्मगुरूंनी  भाविकांना संदेश दिला.  

बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्चच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सभामंडपात फेस्तनिमित्त आज  दिवसभर प्रार्थना सभा होणार आहे. मुख्य प्रार्थना सकाळी 10. 45  वाजता होणार असून आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, आर्चबिशप  एमिरटस गोन्साल्विस आणि सिंधुदुर्गचे बिशप एल्विन बार्रेटो, बिशप अनिल कुतो यांची मुख्य प्रार्थना होणार आहे.  राज्य  मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार, माजी मंत्री, धर्मगुरु, राज्यभरातील चर्चचे प्रतिनिधी यांची प्रार्थनेला उपस्थिती असणार आहे.बासिलिका ऑफ बॉम जिझसमध्ये बंद पेटीत असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचे भाविकांना दुरून दर्शन घेता येणार आहे. सायबांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने  चर्चच्या तिन्ही  प्रवेशद्वारांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.