होमपेज › Goa › तीन हजार पर्यटक मायदेशी रवाना

तीन हजार पर्यटक मायदेशी रवाना

Last Updated: Jun 01 2020 1:56AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात लॉकडाऊनच्या काळात अडकून पडलेले 3 हजार पर्यटक गावी परतले  असून  अजूनही सुमारे अडीच हजार पर्यटक उरले आहेत.   लवकरच त्यांनाही रवाना केले जाणार आहे, असे पोलिस अधीक्षक तथा नोडल अधिकारी बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले.

गोव्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक रशियातून 2212 पर्यटक, तर 1337 ब्रिटिश पर्यटक आल्याची पोलिसांकडे नोंद आहे. इटली,यूक्रेन, उझबेकिस्तान आदी देशांतूनही बरेच पर्यटक आल्याची नोंद आहे.

राज्यात 25 मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली होती. ते पर्यटक तत्पूर्वी गोव्यात दाखल झाले होते. तरी नंतरच्या काळात लॉकडाऊनचा कालावधी वाढत राहिल्याने विदेशी पर्यटक अडकून राहिले. बर्‍याच पर्यटकांची विसा संपली होती. परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्यांच्या विसांना मुदतवाढ देण्यात आली आहे. वरील विदेशी पर्यटकांना खास विमानांनी रवाना करण्यात आले आहे. विदेशी पर्यटकांनी त्यांच्या देशात पाठविण्यासाठी आणखी खास विमाने पाठविण्याचा विचार केला जात आहे. तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा नियमित सुरू झाल्यानंतर गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात जाण्यासाठी सोपे होईल असे, जॉर्ज यांनी सांगितले.

गोव्यात पर्यटनाच्या निमित्ताने आलेले विदेशी पर्यटक उत्तरेतील  कळंगुट, बागा, वागातोर, हणजुणे, शिकेरी, हरमल तसेच दक्षिणेतील माजोेर्डा, कोलवा, बाणावली, वार्का, मोबोरपासून पाळोळेच्या किनार्‍यांवर अडकून पडले होते असे, त्यांनी सांगितले.