Sun, Oct 20, 2019 01:07होमपेज › Goa › तीन दिवसानंतर मान्सून जोर धरणार

तीन दिवसानंतर मान्सून जोर धरणार

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यात मान्सून मंदावला असून  गेले दोन दिवस मान्सूनचा पाऊस सामान्य तर काही भागात मोजक्या प्रमाणात बरसत आहेे. राज्यातील तापमानात मात्र वाढ झाली आहे. राज्यभरात येत्या तीन दिवसांत तुरळक प्रमाणात पाऊस असेल.  तीन दिवसांनंतर मान्सून पुन्हा जोर धरेल, अशी माहिती वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली.  

साहू म्हणाले, राज्यात मान्सूनचा पाऊस गेले दोन दिवस मंदावला असला   गुरुवारी काही मोजक्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 16 व 17 जून रोजी मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. 

गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार  गेल्या 24 तासांत काणकोण व केपे भागात  4 से.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर पेडणे, वाळपई, मडगाव व सांगे भागात 1   से.मी. इतका पाउस झाला. समुद्र खवळलेला असून  मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.  खास करून केरळ व  कर्नाटक समुद्रकिनारपट्टीत  वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 24 तासात त्या किनारपट्टीत उतरू नये, असा इशाराही दिला आहे. 

राज्यातील तापमान वाढले 

गेल्या 24 तासात कमाल तापमान  32.5 अंश सेल्सियस तर किमान 26.7  अंश सेल्सियस इतके आहे. या तापमानात आणखी वाढ होउन  येत्या 24 तासांत कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान तापमान 26  अंश सेल्सियस इतके होण्याची शक्यता आहे.