Wed, Jul 24, 2019 01:57होमपेज › Goa › सांगोल्डात वेश्या व्यवसायप्रकरणी तिघांना अटक; चार युवतींची सुटका

सांगोल्डात वेश्या व्यवसायप्रकरणी तिघांना अटक; चार युवतींची सुटका

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:11AMपणजी : प्रतिनिधी

सांगोल्डा येथे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कारवाई करून मुख्य सूत्रधारासह तीन संशयितांना अटक करुन  चार मुलींची सुटका केली. सुटका केलेल्यांमध्ये नेपाळ येथील तीन व मुंबई येथील एका  पीडित युवतीचा समावेश आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये स्वप्नील सिंग (सुरत, गुजरात), सुनील सिंग (पानिपत, हरयाणा) व कपिल शर्मा ऊर्फ बंटी यांचा समावेश आहे. सुटका केलेल्या सर्व पीडित युवतींना  मेरशी येथील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी  दिलेल्या माहितीनुसार मंगळवार  दि.21 रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या वेश्या व्यवसाय रॅकेटचा कपिल शर्मा हा मुख्य सूत्रधार असून स्वप्नील व सुनील हे दोन्ही संशयित त्याच्यासाठी काम करीत होते. 

कपिल याला यापूर्वीदेखील अशा प्रकरणांमध्ये गुन्हा अन्वेषण विभाग तसेच राज्यातील विविध पोलिस स्थानकांकडून अटक करण्यात आली होती.  सर्व संशयित हे  पीडित मुलींची वेश्या व्यवसायासाठी ठराविक रक्‍कम घेऊन ग्राहकांना विक्री  करायचे.  सदर प्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल परब पुढील तपास करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Tags : Goa, Goa news, Three, arrested, prostitution business, Four, women released,