Mon, Jan 21, 2019 17:39होमपेज › Goa › युवतीसह तिघा मोबाईल चोरट्यांना अटक

युवतीसह तिघा मोबाईल चोरट्यांना अटक

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 11:38PMमडगाव : प्रतिनिधी

फातोर्डा पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई करून तीन मोबाईल चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरीचे सात मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयितामध्ये जावेद अली (26, बायणा वास्को), चिंटू भादूर जस्वार (20, शांतीनगर वास्को) व एका काणकोण येथील युवतीचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे   महिन्यात  फातोर्ड्यातील जॉगर्स पार्क जवळ पार्क केलेल्या दोन दुचाकीतून मोबाईल चोरण्याची घटना घडली होती. 

याप्रकरणी तक्रार नोंद झाल्यावर पोलिसांनी दोन्ही मोबाईल ट्रेकिंगवर टाकून तपास करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी दोन्ही मोबाईलचे लोकेशन वास्को येथे दाखविले असता मागावर राहून पोलिसांनी जावेद आणि चिंटू यांना अटक केली. नंतर त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी चोरीतील भागीदार मुलीलाही अटक केली. सोमवारी झालेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार आणखी एका चोरट्याला पोलीस अटक करणार आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. तिन्ही संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.