होमपेज › Goa › तिसर्‍या मांडवी पुलाचा शेवटचा स्लॅब आज

तिसर्‍या मांडवी पुलाचा शेवटचा स्लॅब आज

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 12 2018 12:34AMपणजी : प्रतिनिधी

मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाच्या खांबावरील शेवटचा स्लॅब बसवण्याचे काम  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.12) सकाळी 9 वाजता सुरू केले जाणार आहे.  

मंत्री गडकरी यांच्या हस्ते बटण दाबून हा स्लॅब पुलावर चढवला जाणार असल्याची माहिती गोवा साधनसुविधा  विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली. सदर पूल भारतातील तिसरा सर्वाधिक लांबीचा केबलस्टेड पूल असल्याचे सांगण्यात आले.

मांडवीवरील या नव्या केबलस्टेड पुलाचे काम वेगाने सुरू असून सुमारे 80 टक्के पूर्ण झाले  आहे. नदीच्या पणजी शहराच्या बाजूला असलेल्या  खांबांना जोडणारा शेवटचा स्लॅब बसवण्याचे काम मंगळवारी (दि.12) हाती घेतले जाणार आहे. केंद्र सरकारकडून मांडवीच्या तिसर्‍या पुलाच्या कामासाठी संपूर्ण निधी देण्यात आला आहे.  

येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मांडवीच्या या तिसर्‍या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे योजले जात असून त्यासाठी भरपावसाळ्यातही पुलाचे काम सुरू ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.