Wed, Sep 26, 2018 08:15होमपेज › Goa › ‘कदंब’बसची चोरी; पणजीत एकास अटक

‘कदंब’बसची चोरी; पणजीत एकास अटक

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMपणजी : प्रतिनिधी

कदंब महामंडळाची बस चोरून नेताना सुरेश कुमार (वय 28, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मडगाव) या संशयिताला पणजी पोलिसांनी  शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून  तो पळवून नेत असलेली 22 लाख रुपये किंमतीची कदंब बसही जप्‍त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीप्रकरणी कदंब महामंडळाचे सहायक संचालक (वाहतूक) पी. बी. सुभेदार  यांनी तक्रार दाखल केली होती. शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता पणजी कदंब बसस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर जीए 03 एक्स 0586 ही कदंब बस उभी करण्यात आली होती. मात्र सदर बस ही पार्क     करून ठेवण्यात आलेल्या जागेवर नसल्याचे दिसून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. बस चोरीला गेल्याचे समजताच   याविरोधात पणजी पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानुसार तपासात  संशयित   सुरेश कुमार याला बससमवेत पणजीतच अटक करण्यात आली.पणजी पोलिस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक स्नेहा गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.