होमपेज › Goa › भिंत अंगावर पडून सावर्डेत युवक जखमी

भिंत अंगावर पडून सावर्डेत युवक जखमी

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:13AM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

मिराबाग सावर्डे येथे घराचे काम सुरू असताना बुधवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मातीची जुनी भिंत अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत अवित अनंत नाईक(25) हा युवक गंभीर जखमी झाला.कोसळलेल्या भिंतीखाली अवित काहीकाळ दाबून राहिल्याने त्याला गंभीर  दुखापत झाली. 

अवित नाईकच्या घराचे काम सुरू आहे. त्याजागी पूर्वी मातीचे घर होते .ते पाडून त्याजागी काँक्रीटचे घर बांधण्याचे काम सुरू होते. बांधकामाच्या ठिकाणी कामगारसुद्धा उपस्थित होते. नवीन घरासाठी काँक्रीटचे खांब उभारण्यात आले होते. मात्र जुन्या भिंती तशाच होत्या.  बुधवारी काम सुरू असताना अवित कामाची पाहणी करत होता. अचानक भिंत कोसळली. जुन्या घराची भिंत बरीच जाड होती. त्यामुळे अवितच्या खांद्याला आणि हाताला जबर दुखापत झाली.त्याच स्थितीत त्याला काकोडा कुडचडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.