होमपेज › Goa › राज्यातील तापमानात वाढ 

राज्यातील तापमानात वाढ 

Published On: May 06 2018 1:53AM | Last Updated: May 06 2018 1:53AMपणजी : प्रतिनिधी  

राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान मुरगाव तालुक्यात 35 डिग्री सेल्सियस इतके नोंद झाले. येत्या 48 तासांत पारा 34 डिग्री सेल्सियस  राहणार असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्‍त केला आहे. 
कमाल तापमानाप्रमाणेच किमान तापमानातही वाढ झाली आहे. किमान तापमान 27.5 डिग्री सेल्सियस इतके नोंद झाले होते. किमान तापमानात   सरासरीपेक्षा 1.2 डिग्री तर कमाल तापमानात सरासरीपेक्षा 0.8 डिग्री सेल्सियस इतकी वाढ झाली आहे. 

राज्यात एप्रिल महिन्यापासून पारा वाढत असून कमी होण्याची शक्यता  नसल्याचे वेधशाळेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येते पाच दिवस उत्तर व दक्षिण गोव्यातील हवामान कोरडे राहील. गोवा वेधशाळेने व्यक्‍त केलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासांत कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 27 डिग्री सेल्सियस राहणार आहे.    वातावरणदेखील ढगाळ राहणार आहे. 

राज्यात अनेक ठिकाणी मार्च महिन्यापासून पावसाचा शिडकावा अनुभवण्यास मिळत आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार मागील दोन महिन्यांत म्हापसा येथे 3.6 मि.मी., फोंडा येथे 16.8 मि.मी., पणजी 29.6 मि.मी., जुने गोवे 1.3 मि.मी., साखळी 0.7 मि.मी., वाळपई 8.7 मि.मी., काणकोण 25.4 मि.मी., दाबोळी 10.4 मि.मी., मुरगाव 0.2 मि.मी., केपे 4 मि.मी. तर सांगे येथे  2.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.