Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकरांवर आजपासून दुसर्‍या टप्प्यातील उपचार 

मुख्यमंत्री पर्रीकरांवर आजपासून दुसर्‍या टप्प्यातील उपचार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर दुसर्‍या टप्प्यातील उपचारांना सोमवार, दि. 26 पासून सुरुवात होत आहे. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत असलेले पर्रीकर यांनी सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी फोनवरून संवाद साधला. राज्यातील सर्वसाधारण स्थिती आणि  प्रशासनाबाबतची माहिती पर्रीकर यांनी अवगत करून घेतली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या आरोग्याबद्दल पसरत असलेल्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन गोमंतकीय जनतेला केले आहे. सोशल मीडियावर पर्रीकरांबद्दल अनेक संदेश पाठवले जात असून ते पर्रीकर यांनी खुद्द लिहिले असल्याचे नमूद केले जाते. अशा तर्‍हेने पाठवले जाणारे सर्व संदेश खोटे असून पर्रीकर यांच्या खासगी सोशल  मीडिया खात्यावरून अधिकृत संदेश पाठवण्यात  येतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

श्री रामांचा आशीर्वाद लाभू दे

रामनवमी सणाच्या निमित्ताने ‘सर्वांना श्री रामांचा आशीर्वाद लाभू दे’, अशी शुभेच्छा पर्रीकर यांनी आपल्या ट्विटर खात्यावर टाकली आहे. 

 

Tags ; goa, goa news, Manohar Parrikar, treatment,


  •