Sat, Feb 16, 2019 16:50होमपेज › Goa › राज्यात येत्या 48 तासांत पावसाची शक्यता

राज्यात येत्या 48 तासांत पावसाची शक्यता

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 28 2018 11:53PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात येत्या 48 तासांत ढगाळ वातावरण राहणार असून पावसाचीही शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात  उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी कमाल तापमान 33.8 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान  25.8 डिग्री सेल्सियस नोंद झाले. 

सरासरीपेक्षा कमाल तापमानात 0.3 डिग्री सेल्सियस इतकी वाढ झाली आहे. पणजी येथील सर्वाधिक कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद झाले होते. उत्तर व दक्षिण गोव्यात येत्या पाच दिवसांत हवामान कोरडे  राहणार आहे. त्यामुळे तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. पणजी वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार रविवार दि.29 रोजी कमाल तापमान  34  डिग्री सेल्सियस  तर किमान तापमान 26 डिग्री सेल्सियस, सोमवार दि.30 रोजी  कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस  तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस  इतके नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे.