Thu, Nov 22, 2018 16:46होमपेज › Goa › राज्यात पावसाची शक्यता

राज्यात पावसाची शक्यता

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अरबी  समुद्राच्या  आग्नेय भागात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमाराला ओखी चक्रीवादळ धडकले. राज्यात या चक्रीवादळामुळे हवामानात बदल आढळून आला असून, सोमवारी काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांतही ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता आहे, असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे. समुद्रात 45 ते 50 कि.मी. प्रति तास या वेगाने ओखीमुळे वादळी वारे वाहत असून  

वार्‍याचा वेग वाढून 60 कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता आहे.  समुद्र खवळण्याची शक्यताही वेधशाळेने व्यक्त केली आहे.