Tue, Sep 25, 2018 02:57होमपेज › Goa › राज्यात ४८ तासांत हलक्या सरीची शक्यता

राज्यात ४८ तासांत हलक्या सरीची शक्यता

Published On: Apr 08 2018 2:14AM | Last Updated: Apr 08 2018 2:14AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात पुढील 48 तासांत विजेचा लखलखाट व ढगांच्या  गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्‍त केली आहे. 

राज्यात दमट वातावरण राहणार असून त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता  आहे. राज्यात कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस व किमान तापमान  25.4 डिग्री सेल्सियस नोंद झाले आहे.  येत्या  48 तासांत कमाल तापमानात किंचित वाढ होत ते 34 डिग्री सेल्सियस तर  किमान तापमानात किंचित घट होत ते 25 डिग्री सेल्सियस इतके नोंद होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. 

येते 48 तास म्हणजे 8 व 9 एप्रिल रोजी विजेचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह  पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. गोव्याबरोबरच, दक्षिण  कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात  हे वातावरण राहणार आहे, असे वेधशाळेने कळविले आहे.