Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Goa › रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी वेर्ण्यातील एकाला अटक

रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी वेर्ण्यातील एकाला अटक

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:52PMपणजी : प्रतिनिधी

बेकायदेशीररीत्या रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी  वेर्णा येथील एलॉय ज्योकीम गोम्स (वय 42) याला कदंब बसस्थानकावर   अटक  केली. पोलिसांनी   त्याच्याकडून  11 जिवंत काडतुसेही जप्‍त केली.  याप्रकरणी एलॉय याची सध्या शस्त्र कायद्यांंतर्गत कसून चौकशी केली जात आहे. 

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पोलिसांचे वाहन  मंगळवारी  सकाळी  9.30 वाजता  गस्तीवर असताना एलॉय हा पणजी येथील कदंब बसस्थानकावर   आपल्यासोबत रिव्हॉल्व्हर घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. संशयावरून त्याला हटकले असता त्याने संबंधित शस्त्राबाबत नीट माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी  सांगितले.एलॉयकडे रिव्हॉल्व्हरचा परवानादेखील नव्हता. तपासणी केली असता त्याच्याकडे 11 जिवंत  काडतुसेही आढळून आली.   पोलिसांनी त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर तसेच काडतुसे जप्‍त करून त्याला अटक केली. त्याच्या विरोधात शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विवेक हळर्णकर तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.