Sat, Apr 20, 2019 16:03होमपेज › Goa › खाणींच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अधिकारी समाधानी : आचार्य

खाणींच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अधिकारी समाधानी : आचार्य

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 11:36PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात खाणबंदी लागू झाल्यानंतरही खाणीतील सुरक्षा व्यवस्था आणि पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने केलेल्या व्यवस्थेबद्दल ‘केंद्रीय खाण सुरक्षा संचालनालयाने’ (डीजीएमएस) समाधान व्यक्‍त केले आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी दिली. पावसाळ्यात राज्यातील बंद असलेल्या खाणींच्या सभोवतालच्या  लोकवस्तीला तसेच शेतजमिनींना धोक्याची शक्यता असते. त्यासंदर्भात  खाण खात्याने राज्यातील खाणींचे 6 जून आणि 13 जून रोजी सर्वेक्षण केले. त्यासंबंधीच्या अहवालावर  ‘डीजीएमएस’ने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत  चर्चा झाली. खाण खात्याचे सचिव दौलत हवालदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 

सदर बैठकीत खात्याने यासंबंधी राबवलेल्या उपाययोजनांवर केंद्रीय अधिकार्‍यांनी समाधान व्यक्‍त केले. राज्यातील धोकादायक ठरू शकणार्‍या   खाणींतील डम्पवर सुरक्षेसाठी आच्छादन घालण्यात आल्याचे तसेच साठलेल्या पाण्याचा निचरा होण्याची  योग्य व्यवस्थाही करण्यात आल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. केंद्राने सूचवलेले सर्व सुरक्षा उपायांवर राज्य खाण व भूगर्भ  खात्याने तत्परता दाखवल्याबद्दल ‘डीजीएमएस’च्या अधिकार्‍यांनी समाधान दर्शवले. तरीही 26 ते 30 जून या कालावधीत धोकादायक ठरू शकणार्‍या सर्व खाणींचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत, असे आचार्य यांनी  सांगितले.