Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Goa › कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप उद्या, परवा बँका बंद

कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप उद्या, परवा बँका बंद

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:19PMपणजी : प्रतिनिधी  

बँक कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे देशभरातील बँक कर्मचार्‍यांनी बुधवार दि.30 व  गुरुवार दि.31 मे असा दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या देशव्यापी संपात  गोव्यातील  सुमारे 5 हजारहून अधिक  बँक  कर्मचारीदेखील सहभागी होणार असल्याने या काळात बँका बंद राहणार आहेत. त्यानुसार 30 मे रोजी पणजीत आझाद मैदानावरून सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बँक कर्मचारी संघटनेच्या गोवा शाखेचे निमंत्रक संतोष हळदणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे  दिली. 

या मोर्चात राज्यभरातील बँक कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही संघटनेतर्फे करण्यात आले आहे.  बँक कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आलेले अपयश,  कर्मचार्‍यांच्या वेतनात सुधारणा करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष, बँक कर्मचार्‍यांना नियमित पगारवाढ देणे व अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचार्‍यांनी हा संप पुकारला आहे.