Mon, Aug 19, 2019 07:02होमपेज › Goa › पणजीत २३ फेब्रुवारीपासून संगीत नाटक महोत्सव

पणजीत २३ फेब्रुवारीपासून संगीत नाटक महोत्सव

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 07 2017 11:56PM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

गोवा कला अकादमी आयोजित यंदाच्या संगीत नाटक महोत्सवासाठी एकूण 8 नाटकांची निवड करण्यात आली आहे. सदर  महोत्सव दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2018 दरम्यान कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात होणार आहे. निवड करण्यात आलेल्या नाटकानुसार महोत्सावाला सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.

दि. 23 फेबु्रवारी रोजी महोत्सवातील प्रारंभी नाट्यप्रयोग प्रा. वसंत कानेटकर लिखित सं. कधीतरी कोठेतरी  श्री रघुगोनशेट सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, कोरगाव या संस्थेतर्फे सादर केला जाणार आहे. दि. 24 रोजी रेनबो स्पोर्टस् अ‍ॅण्ड कल्चरल क्‍लब, होंडा- सत्तरी ही संस्था अशोकजी परांजपे लिखित सं. संत गोरा कुंभार हे नाटक सादर करण्यात येणार आहे. दि. 25 रोजी प्रा. वसंत कानेटकर लिखित सं. मत्स्यगंधा हे नाटक श्री ओमकार थिएर्ट्स पेडणे  ही संस्था सादर करणार आहे.  दि. 26 रोजी होंसेकर प्रासादिनी नाट्य संपदा, मडकई या संस्थेचे द. ग. गोडसे लिखित सं. धाडिला राम तिने का वनी हे नाटक सादर होणार आहे. दि.27 रोजी  री म्हारेंगण देव प्रासादिक नाट्य मंडळ, गावणे- बांदोडा ही संस्था बाबाजीराव राणे लिखित सं. राजा हरिश्‍चंद्र हे नाटक महिला कलाकार सादर करणार आहे.

दि. 28 रोजी जगदिश दळवी लिखित सं. लावणी भुलली अभंगाला हे नाटक मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था मोरजी ही संस्था सादर करणार आहे. दि. 1 मार्च रोजी विद्याधर गोखले लिखित सं. जय जय गौरीशंकर हे नाटक चौरंग नागेशी बांदोडा ही संस्था सादर करणार आहे.  नाट्यतरंग म्हापसा गोवा या संस्थेचे गोविंद बल्लाळ देवल लिखित सं. संशयकल्लोळ हे महोत्सवातील शेवटचे नाटक दि. 5 मार्च रोजी सादर होणार आहे.

कला अकादमीकडे आलेल्या प्रवेशिकांमधून प्रत्यक्ष तालमी पाहून वरील सर्व नाटकांची निवड करण्यात आली आहे. डॉ. वंदना घांगुर्डे, नामदेव शेट व चंद्रकांत फटी गावस यांनी तालमीसाठी निरीक्षक म्हणून काम पाहिले. महोत्सवातील सर्व नाटके रोज सायंकाळी 7 वाजता होणार आहेत. सर्व संस्था व रसिकांनी हा महोत्सव यशस्वी  करावा, असे आवाहन कला अकादमीने केले आहे.