Sun, Jul 21, 2019 09:51होमपेज › Goa › मडकईकरांच्या  बंगल्याबाबत कारवाईचे राज्यपालांचे निर्देश 

मडकईकरांच्या  बंगल्याबाबत कारवाईचे राज्यपालांचे निर्देश 

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 03 2018 1:32AMपणजी : प्रतिनिधी

वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या जुने गोवे येथील कथित बेकायदेशीर बंगल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी  राज्याचे मुख्य  सचिव  धर्मेंद्र शर्मा यांना पत्राद्वारे दिले आहेत.

मडकईकर यांच्या कथित अनधिकृत बंगल्याविरोधात आरटीआय कार्यकर्ते अ‍ॅड. आयरीश रॉड्रिगीस यांनी मागील महिन्यात राज्यपाल, भारतीय पुरातत्त्व विभाग व जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यपाल सिन्हा यांनी वरील निर्देश दिले आहेत.

वीजमंत्री मडकईकर यांचा हा बंगला जुने गोवे येथील बासिलिका ऑफ बॉम जीझस या संरक्षित स्थळाच्या संरक्षक भिंतीपासून अवघ्या 300 मीटर्स अंतरावर आहे. त्यामुळे ते भारतीय  पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे उल्‍लंघन ठरते. याप्रकरणी  अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही पत्राद्वारे तक्रार केली असून याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली  आहे. जुने गोवे येथील  सर्व्हे क्रमांक  144/1 व  144/2 या  जागेत हा बंगला उभारला आहे. मडकईकर यांच्याच  निकिताशा रियाल्टर्स प्रा. लि. या कंपनीकडून त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.