Sun, Feb 23, 2020 10:06



होमपेज › Goa › सरकार बडतर्फीची काँग्रेसची मागणी वैफल्यातून

सरकार बडतर्फीची काँग्रेसची मागणी वैफल्यातून

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:29PM



पणजी : प्रतिनिधी

राज्यातील विद्यमान भाजप युती सरकार बडतर्फ करावे, या काँग्रेसने राज्यपालांकडे केलेल्या मागणीचा निषेध आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे अपयश लपवण्यासाठी  काँग्रेसकडून ही मागणी केली जात आहे, अशी टीका दक्षिण गोवा खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.सदर मागणी प्रदेश काँग्रेसने  वैफल्यग्रस्त होऊन केली आहे, असे सांगून दीड वर्षानंतर काँग्रेस आता का जागी झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अ‍ॅड. सावईकर म्हणाले,  भाजप युती  सरकारने 16 मार्च 2017 रोजी गोवा विधानसभेत आपले बहुमत  सिद्ध केले होते. मात्र काँग्रेसला आता अचानक  450 दिवसांनंतर अर्थात दीड वर्षाने जाग आली आहे. त्यातही  16 पैकी केवळ 13 आमदारांसह काँग्रेसने राज्यपालांची भेट घेतली.काँग्रेसचे नेतृत्व अपयशी ठरत आहे. ज्या-ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यात भाजपला यश मिळाले तर काँग्रेसला अपयश प्राप्‍त झाले.  त्यामुळे अपयश लपवण्यासाठी तसेच वैफल्यग्रस्त होऊन सरकार बडतर्फीची मागणी केली गेली आहे. मात्र काँग्रेसच्या या डावपेचांना जनता बळी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यावेळी उपस्थित होते.