Wed, Jan 16, 2019 18:05होमपेज › Goa › सिनेमाचा डिजिटल मीडियापासून बचाव आवश्यक 

सिनेमाचा डिजिटल मीडियापासून बचाव आवश्यक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

सिनेमा या सर्वात मोठया मनोरंजनाच्या माध्यमाचा डिजिटल मीडियापासून बचाव केला पाहिजे,असे मत चित्रपट निर्माते करण जोहर यांनी व्यक्त केले. इफ्फी निमित्त मॅकेनिज पॅलेसमध्ये आयोजित ‘मास्टरिंग अ न्यू रिअ‍ॅलिटी’ चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चा चित्रपट निर्मात्या एकता कपूर, व्हायकॉमचे सीईओ सुधांशू वस्त सहभागी झाले होते. रानजॉय बॅनर्जी  हे समन्वयक होते. 

करण यांनी सांगितले की,  सिनेमाचा आशय आणि  विषय बदलत आहे. तसेच डिजिटल मध्यम सिनेमाची जागा घेत आहे, हे पाहून आपले काळीज तुटते. डिजिटल मीडियावर एवढा माहितीचा भडिमार होतो की प्रेक्षक भ्रमित होतात. एक सकारात्मक बाब ही आहे,की जर सिनेमा चित्रपटगृहात चालला नाही तर तो डिजिटल मीडियातही चालणार नाही. चित्रपटगृह सिनेमाची जननी आहे. त्यामुळे सिनेमाचा आशय बळकट करण्याची गरज आहे. सिनेमात खंड न पडता एका पाठोपाठ एक सिनेेमा तयार झाला पाहिजे, असे करण म्हणाले. सुधांशू यांनी सांगितले की, जेव्हा सिनेमात अधिक नफा असेल,तेव्हाच अधिक लोक सिनेनिर्मिती कडे वळतील. प्रेक्षकांना हवा असलेला सिनेमा त्यांना दिला पाहिजे.

चित्रपट बनवताना मानधनाला बगल द्या : जोहर

सिनेमाच्या बजेटचा विचार करता प्रमुख भूमिका बजावणार्‍या अभिनेत्याने मागितलेल्या मानधनाला बगल दिली पाहिजे. असे केले तर  तर सिनेमा कसा करणार याची चिंता करण्याची गरज नाही. अभिनेत्यासाठी सगळा पैसा खर्च केला तर सिनेमा करताना तडजोड करावी लागणारच, असे करण जोहर म्हणाले.