Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Goa › फॉर्मालिनयुक्‍त मासळीबाबत विरोधकांची मागणी फेटाळली

फॉर्मालिनयुक्‍त मासळीबाबत विरोधकांची मागणी फेटाळली

Published On: Jul 19 2018 3:41PM | Last Updated: Jul 19 2018 3:42PMपणजी: प्रतिनिधी

फॉर्मालिनयुक्‍त मासळीवर चर्चा करा अशी मागणी करुन विरोधी पक्ष काँग्रेसने गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बराच गदारोळ केल्याने सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना  कामकाज पाच वेळा तहकूब करावे लागले.उद्या शुक्रवार सकाळी 11.30 वाजता विधानसभेच्या कामकाजास पुन्हा सुरवात होईल.

फॉर्मालिनयुक्‍त मासळीवर वर चर्चा आवश्यक आहे. फॉर्मालिनयुक्‍त मासळीबाबत जनतेमध्ये भीती व्यक्‍त केली जात असल्याने त्यावर सभागृहाच्या कामकाजाच्या सुरवातीलाच चर्चा व्हावी मागणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी विधानसभेचे कामकाज सुरु होताच सभापती डॉ. सावंत यांच्याकडे केली. परंतु प्रश्‍नोत्तर तास महत्वाचा असल्याने तसेच काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत तसेच भाजप आमदार निलेश काब्राल यांनी फॉर्मालिन विषयावर लक्षवेधी सूचना मांडल्याने त्यावेळी याविषयावर चर्चा करु असे म्हणत सभापती डॉ. सावंत यांनी विरोधी पक्षाची ही मागणी फेटाळून लावली.