Mon, Sep 24, 2018 19:36होमपेज › Goa › कार नदीत कोसळली

कार नदीत कोसळली

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:12AMडिचोली : प्रतिनिधी 

सारमानस डिचोली येथील फेरी धक्क्यावर रविवारी फेरीबोटीतून स्विफ्ट कार बाहेर काढत असताना चालकाचा ताबा सुटल्याने सदर कार  नदीपात्रात कोसळली, मात्र सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला. घटनेची माहिती मिळताच डिचोलीतील  अग्निशमन दलाच्या  जवानांनी कार पाण्याबाहेर काढली. या अपघातात कारचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कारच्या मालकाकडून सांगण्यात आले. दरम्यान, येथील फेरी धक्क्याचा उतार कमी करून रुंदी वाढवण्याची मागणी स्थानिक पंचायत सदस्य अनिल नाईक व नागरिकांनी केली आहे.