Tue, Sep 25, 2018 13:30होमपेज › Goa › देशस्थिती बदलण्याची माहितीपटात क्षमता

देशस्थिती बदलण्याची माहितीपटात क्षमता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

माहितीपट संवाद साधण्याचे एक उत्तम साधन आहे. देशाची स्थिती बदलण्याची क्षमता महितीपटात आहे. त्यामुळे देशात केवळ माहितीपट दाखवणार्‍या काही वाहिन्या हव्यात, असे मत प्रसिद्ध माहितीपट निर्माते माईक पांडे यांनी व्यक्त केले.

48व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. 

वन्यजीवांवर माहितीपट बनवण्यासाठी सरकारने आजपर्यंत कोणत्याही दिग्दर्शकाला निधी दिलेला नाही. वन्यजीवांवर माहितीपट काढण्यासाठी निधी मिळाला पाहिजे, असेही  पांडे म्हणाले.

पांडे म्हणाले की, सत्य दाखवण्याचे माहितीपट प्रभावी माध्यम आहे. माहितीपट लोकांच्या मनाला आणि मस्तकाला भिडते. त्यामुळे   माहितीपट निर्मितीची देशाला आवश्यकता आहे. एक माहितीपट देशाची स्थिती बदलू शकतो. आपण स्वत: याचा अनुभव घेतला आहे, असे पांडे यांनी स्पष्ट केले. देशात वन्यजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दिल्लीतील प्रदूषणाने मर्यादा ओलांडली आहे. अशा अनेक समस्या आहेत ज्यावर कोणी भाष्य केलेले नाही, असे मुद्दे माहितीपटातून देशासमोर आले पाहिजेत, असेही पांडे म्हणाले.