Mon, Jul 22, 2019 03:08होमपेज › Goa › दहावीची परीक्षा आजपासून सुरू

दहावीची परीक्षा आजपासून सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या दहावीच्या परीक्षांना आज, सोमवार दि. 2 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या परीक्षा राज्यातील 27  केंद्रांवर घेण्यात येणार असून यंदा 20 हजार 259  विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा आकडा वाढला आहे. गेल्यावर्षी 19 हजार 369 परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. 21 एप्रिलपर्यंत परीक्षा चालणार असून इंग्रजी विषयाच्या पेपरने परीक्षेला सुरवात होत आहे. परीक्षाथीर्र्ंमध्ये 10 हजार 98 मुली तर 10 हजार 161 मुलेे आहेत. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने दिलेल्या माहितीप्रमाणे परीक्षेला सकाळी 9.30 वाजता सुरवात होईल. परीक्षा सुरु व्हायच्या अर्धा तास आधी परिक्षार्थींनी परीक्षागृहात उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. 

डिचोली, काणकोण, कुंकळी, म्हापसा, हळदोणा, मडगाव, पणजी, पेडणे, पिलार, फोंडा, साखळी, वास्को, नावेली, पर्वरी, केपे, मार्शेल, मंगेशी, सांगे, शिरोडा, शिवोली, वाळपई, मांद्रे, कळंगुट, वेर्णा, माशे, कुडचडे आणि धारबांदोडा या तालुक्यातील केंद्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. 

प्रश्‍नपत्रिका सोडवण्यासाठी सकाळी 9.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंतचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षागृहात कोणत्याही प्रकारची विद्युत उपकरणे  नेता येणार नाहीत. केंद्रावर अर्धा तास उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्याचप्रमाणे प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी 1 तास उरला असताना विद्यार्थ्यांना परीक्षागृह सोडता येणार नाही, असे शालांत मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

 

Tags : goa, goa news, Panaji, Class X examination, 


  •