होमपेज › Goa › दहावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून

दहावीची पुरवणी परीक्षा उद्यापासून

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी 

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाकडून घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. ही परीक्षा 25 जूनपर्यंत चालणार आहे. राज्यातील 5 केंद्रामध्ये ही परीक्षा घेण्यात येणार असून   1 हजार 637 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून यात 892 मुलेे आणि 745 मुलींचा समावेश आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेला सकाळी9.30 वाजता तर दुसर्‍या सत्रातील परीक्षेला 2.30 वाजता सुरूवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षा सुरु होण्याआधी 30 मिनिटे अगोदर येण्याची सूचना केली आहे. 

कुडचडे केंद्राची परीक्षा (कुडचडे, केपे आणि सांगे) चंद्रभागा तुकोबा नाईक खांदीवाडा येथे घेण्यात येईल. म्हापसा केंद्राची परीक्षा (बार्देश, पेडणे, डिचोली, हळदोणे, साखळी, शिवोली, वाळपई, मांद्रे आणि कळंगुट) म्हापसा येथील जनता हायस्कूल मध्ये घेण्यात येईल. मडगाव केंद्राची परीक्षा (सासष्टी, काणकोण, कुंकळी, नावेली, वेर्णा, वास्को आणि माशे) होली स्पिरीटमध्ये घेण्यात येईल. 

पणजी केंद्राची परीक्षा (तिसवाडी, पिलार आणि पर्वरी) कुजिरा येथील मुष्टीफंड हायस्कूल विद्यालयात होणार आहे. फोंडा केंद्राची परीक्षा (फोंडा, मार्शेल, मंगेशी, तिस्क, धारबांदोडा आणि शिरोडा) एस.एस. समिती इंदिराबाई व्ही. भट ढवळीकर विद्यालयात होेणार आहे, असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.