Wed, Apr 24, 2019 21:56होमपेज › Goa › ताळगाव, पणजीत खड्ड्यांची डोकेदुखी

ताळगाव, पणजीत खड्ड्यांची डोकेदुखी

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:39PMपणजी : अभिजीत रांजणे

गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पणजी, ताळगावसह अनेक भागात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांची नागरिकांना डोकेदुखी ठरत आहेत.  काही भागात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे महिला, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यावर संबंधितांनी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.

पणजीतील कला अकादमीसमोरील रस्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे चारीबाजूने येणार्‍या वाहनांना कसरत करावी लागत आहे. काहीवेळा या खड्ड्यामुळे अपघातही घडले आहेत. जुन्या सचिवालयासमोरील कॅसिनो शेजारील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळेही अपघताचे धोके निर्माण झाले आहेत. या भागात खड्डे न दिसल्यामुळे काही दुचाकी वाहनांचा अपघात झाला आहे. 

पणजीसह ताळगावमधील काही भागातील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामुळे महिला, विद्यार्थी आणि बालरथांना अडथळे निर्माण होत आहेत. पणजीतून मिरमारकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. यावर संबंधितांनी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी लोकांतून होत आहे.