होमपेज › Goa › फिरत्या मासळी विक्रेत्यांवर कारवाई करणार : परवीन शेख 

फिरत्या मासळी विक्रेत्यांवर कारवाई करणार : परवीन शेख 

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

वाळपई : प्रतिनिधी

वाळपई नगरपालिकेच्या मासळी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येते आहे. मासळी विक्रेत्यांच्या  मागणीनुसार शहरातील फि रती मासळी विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती वाळपईच्या नगराध्यक्षा परवीन शेख, मुख्याधिकारी सिंथिया मिस्किता यांनी दिली आहे.  मात्र, वाळपईच्या मासळी मार्केटमध्ये मासळी विक्री करणार्‍यांनी नागरिकांना चांगल्या दर्जाचे मासे देण्यात यावेत, अशा सूचना मुख्याधिकार्‍यांनी केल्या आहेत.

पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्षा परवीन शेख यांनी सांगितले, की वाळपई शहरात अनेक ठिकाणी फिरती मासळी विक्री करणार्‍यांमुळे मार्केटमधील मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. या संबंधीची कैफियत त्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनासमोर मांडल्यानंतर पालिका मार्केट निरीक्षक व संबंधित अधिकार्‍यांनी सदर व्यवसाय बंद केला.  नागरिकांच्या वाढत्या तक्रारी विचार केला तर मार्केटमध्ये  दर्जेदार मासळी  विक्रीस  येत नाही. यामुळे फि  रत्या मासळी विके्रत्यांकडे नागरिक मासळी खरेदी करतात. येथील मासळी विक्रेत्यांनी नागरिकांना याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी संधी देवू नये.

वाळपई  नगरपालिका क्षेत्राबाहेरील विकणार्‍या मासळी विक्रेत्यांबाबतीत नगरपालिका जबाबदार नाही. काही ठिकाणी अजूनही  बेकायदा  मासळी विक्री करण्यात येत आहे. मात्र, सदर परिसर वाळपई नगरपालिका क्षेत्राचा भाग नाही,  असे शेख यांनी सांगितले.