होमपेज › Goa › मंगेशी येथे पर्यटन खात्याची दहा गाड्यांवर कारवाई

मंगेशी येथे पर्यटन खात्याची दहा गाड्यांवर कारवाई

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 11:28PMफोंडा : प्रतिनिधी 

मंगेशी येथील मंगेशी देवस्थानच्या परिसरातील गाड्यांवर शनिवारी पर्यटन खात्यातर्फे पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पर्यटन खात्यातर्फे गाडेवाल्यांना गाडे हटावाबाबत चोवीस तासांची मुदत दिली होती. चोवीस तासांची मुदत शनिवारी संपल्यानंतर पर्यटन खात्यातर्फे ही धडक कारवाई करण्यात आली. एकूण 10 गाडेवाल्यांना यावेळी हटविण्यात आले.

मागील काही वर्षापासून गाडेवाल्यांनी पर्यटन खात्याच्या या जागेवर अतिक्रमण केल्याने सदर गाडेवाल्यांना जागा रिकामी करावी, अशी नोटीस बजावण्यात आली होती. सदर कारवाई करताना पर्यटन खात्यातर्फे जेसीबीचा वापर न करता मजूराच्या सहाय्याने गाडे हटवून जागा मोकळी केली. ही कारवाई करताना येथील स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवल्याचे काही पंचायत सदस्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मंगेशी येथील काही स्थानिक या जागेवर व्यवसाय करून आपला उदारनिर्वाह चालवित होते.