Wed, Feb 20, 2019 16:49होमपेज › Goa › मडगाव येथे स्वाईन फ्ल्यूचा संशयित रुग्ण?

मडगाव येथे स्वाईन फ्ल्यूचा संशयित रुग्ण?

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMमडगाव : प्रतिनिधी 

मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेला रुग्ण आढळल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे. सदर रुग्णाची वैद्यकीय चाचणी करून रक्‍ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा यांनी दिली.

स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णाला चार दिवसांपूर्वी हॉस्पिसियोत उपचारांसाठी भरती करण्यात आले होते. त्याला स्वाईन फ्ल्यूप्रमाणे लक्षणे आढळून आल्याने तीन दिवस इस्पितळात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

डॉ. आल्मेदा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रक्‍त चाचणीचा अहवाल आल्यानंतर रोगाचे निदान होणार असून येत्या दोन दिवसांत अहवाल येण्याची शक्यता आहे. तरीही हॉस्पिसियोकडून आवश्यक त्या उपाययोजना अवलंबण्यात आलेल्या आहेत. सदर स्वाईन फ्ल्यूचा संशयित रुग्ण स्थानिक असल्याचे सांगून  हॉस्पिसियोकडून सर्व प्रकारचे खबरदारीचे उपाय राबविण्यात आले आहेत, असेही डॉ. आयरा आल्मेदा यांनी सांगितले.