Tue, Jul 23, 2019 11:08होमपेज › Goa › खाण घोटाळा सुनावणी १८ ऑगस्टपर्यंत तहकूब

खाण घोटाळा सुनावणी १८ ऑगस्टपर्यंत तहकूब

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:35AMमडगाव ः प्रतिनिधी

खाण लीज नूतनीकरणाच्या विलंबास अनुमती याप्रकरणी गेल्यावेळी सरकारी वकिलाने सदर खटला विशेष न्यायालयात चालविण्याची मागणी केली होती.विशेष न्यायालयाची मंजुरी प्रलंबित असल्याने सदर प्रकरणाची सुनावणी 18 ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

शासनातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.कीर्तनी बाजू मांडत आहेत. शुक्रवारी न्यायालयात खाण उद्योजक  संशयित प्रफुल्ल हेदे व अँथनी डिसोझा त्यांच्या वकीलासह उपस्थित होते. तर आमदार दिगंबर कामत यांनी गैरहजर राहण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली होती.

मागील सुनावणीवेळी सदर प्रकरण खनिज व खाण कायद्याअंतर्गत येत असल्याने सदर खटला विशेष न्यायालयात चालविण्याची मागणी सरकारी वकिलाने केली होती. सदर मागणीची मंजुरी उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने शुक्रवारी सुनावणी तहकूब करण्यात आली.

दक्षिण गोवा सत्र न्यायाधीश सायोनारा लाड यांच्या न्यायालयात सदर खटला सुरू आहे. आमदार दिगंबर कामत, खाण उद्योजक प्रफुल्ल हेदे आणि अँथनी डिसोझा या प्रकरणात संशयित आहेत. हेदे यांच्या कुळे येथील खाणीच्या लीज नूतनीकरणाच्या विलंबास नियम डावलून परवानगी दिल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.