Thu, Nov 15, 2018 13:49होमपेज › Goa › वाहतूक नियम मोडल्यास 3 महिने परवाना निलंबित

वाहतूक नियम मोडल्यास 3 महिने परवाना निलंबित

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:17AMपणजी : प्रतिनिधी

वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केल्यास चालक परवाना तीन  महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय गोवा वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निर्देशांचे या निर्णयाद्वारे पालन केले जात आहे, अशी माहिती वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली.

देशभरात वाढते रस्ते अपघात  तसेच  त्यात होणारे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी   सर्वोच्च न्यायालयाच्या  रस्ता सुरक्षा समितीने  वाहतूक नियमांचे उल्‍लंघन केल्यास  चालक परवाना तीन  महिन्यांसाठी निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. वेगाने वाहन चालवणे,  ट्रॅफीक सिग्‍नल तोडणे, क्षमतेपेक्षा जादा सामान मालवाहू वाहनांमधून नेणे, मालवाहू वाहनांमधून प्रवासी वाहतूक  करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, तसेच वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा वाहतूक नियम उल्‍लंघनासंदर्भात कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.  सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशांचे गोवा वाहतूक पोलिसांनी काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक नियमांचे उल्‍लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित वाहन चालकाचा चालक परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित  करण्याची शिफारस  साहाय्यक वाहतूक  संचालकांना केली जाईल. 

Tags : Goa, Suspended, license, 3 months, traffic rules, break