Thu, Jun 27, 2019 13:53होमपेज › Goa › सुदिन रेडकरविरोधी तक्रारींची उपअधीक्षकांकरवी चौकशी

सुदिन रेडकरविरोधी तक्रारींची उपअधीक्षकांकरवी चौकशी

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 09 2018 12:21AMपणजी : प्रतिनिधी

पोलिस उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांच्याविरोधातील दोन प्रकरणांत खात्यांतर्गत चौकशी पोलिस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी करावी, असा आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक  अरविंद गावस यांनी दिली. 

पोलिस उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांची सध्या गोवा राखीव दलात बदली करण्यात आली आहे. एका व्यक्‍तीला लाथांनी मारहाण करतानाच्या   सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे रेडकर यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे.  सांगे येथील व्यावसायिक अमित नाईक यांना 25 मार्च रोजी पोलिस कोठडीत मारहाण केल्याचाही रेडकर यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. 

पोलिस उपअधीक्षक सावंत या रेडकर यांच्याविरूद्ध असलेल्या दोन्ही तक्रारींची  शहानिशा करून अहवाल पाठवणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले.