Sun, Jul 05, 2020 22:05होमपेज › Goa › प्रादेशिक पक्षाविना केंद्रात सरकार स्थापने अशक्य

प्रादेशिक पक्षाविना केंद्रात सरकार स्थापने अशक्य

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 12:34AMपणजी : प्रतिनिधी

कुठलाच राष्ट्रीय पक्ष भविष्यात प्रादेशिक पक्षाच्या मदतीशिवाय  केंद्रात  सरकार स्थापन करू शकणार  नाही. मग तो भाजप असो किंवा काँग्रेस. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कुठलाच पक्ष एकटा 252 जागा पेक्षा जादा जागा जिंकू शकणार नाही. त्यामुळे भविष्यात सरकार स्थापनेसाठी प्रादेशिक पक्षाचीच गरज भासणार आहे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी मगोच्या बैठकीनंतर सांगितले.

पणजी येथील मगो केंद्रीय समितीची बैठक मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, आमदार दीपक पाऊसकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मगो पक्ष कुठल्याच राजकीय पक्षात विलीन होणार नाही. मगोला हव्या त्या  अन्य  राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याची सूट असावी, असा ठराव  शनिवारी झालेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगो) केंद्रीय समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.

भाजपने  मागील वेळी  मगो पक्षाचा घात केला, असा ठरावही मांडण्यात आला आहे. या बैठकीत बरीच वादळी चर्चा झाल्याने अखेर मांडण्यात आलेल्या ठरावांवर पुढील बैठकीत चर्चा करण्याचा निर्णय घेऊन बैठक आटोपती घेण्यात आली.