Thu, Apr 25, 2019 15:25होमपेज › Goa › मोपा विमानतळावरील काम बंद 

मोपा विमानतळावरील काम बंद 

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:27AMपेडणे : प्रतिनिधी 

मोपा विमानतळ प्रकल्प हा  पेडणेकरांच्या भल्यासाठी हवा. मात्र,  विमानतळ प्रकल्पावर स्थानिकांना अजूनपर्यंत एकही नोकरी देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिलेले आश्‍वासन जीएमआर कंपनीकडून पाळण्यात न आल्याने शनिवारी दुपारी 12.30च्या दरम्यान विमानतळ प्रकल्पाच्या जागेत धडक देत पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी मोपा विमानतळाचे काम बंद करण्याचे आदेश दिले. जोपर्यंत पेडणेकरांना मोपा विमानतळ प्रकल्पाचा फायदा होणार नाही, तोपर्यंत मोपा विमानतळ प्रकल्पाविरोधात आंदोलन छेडून हा प्रकल्प बंद पाडण्यात येणार असल्याचा इशारा मंत्री आजगावकर यांनी दिला. 

शनिवारी सकाळी रेषा माशेलकर उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर आजगावकर व त्यांचे समर्थक थेट मोपा येथील विमानतळ प्रकल्पाच्या जागेत गेले. यावेळी मोपाच्या सरपंच पल्लवी राऊळ, वारखंडचे सरपंच मंदार परब, कोरगावच्या सरपंच प्रमिला देसाई, धारगळचे सरपंच वल्लभ वराडकर, उद्योजक जीत आरोलकर, सदस्य अब्दुल नाईक, स्वाती गवंडी, सीमा साळगावकर, उदय पालयेकर, रंगनाथ कलशावलर, संजय तुळसकर, प्रदीप पटेकर, रंगनाथ कांबळी उपस्थित होते.