Tue, Nov 20, 2018 01:15होमपेज › Goa › सादोळशेत स्लॅब कोसळून कामगार ठार; ६ जण जखमी

सादोळशेत स्लॅब कोसळून कामगार ठार; ६ जण जखमी

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:48PMकाणकोण  ः प्रतिनिधी 

सादोळशे येथे  एका चर्चचे बांधकाम सुरू असताना, बुधवारी संध्याकाळी अचानक  काँक्रिटचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत गौतम कुमार (32,मूळ रा.पश्‍चिम बंगाल) हा कामगार जागीच ठार झाला. अन्य सहाजण या घटनेत जखमी झाले.  

 या घटनेची माहिती मिळताच काणकोण अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन,  कामगाराचा मृतदेह   काँक्रिटच्या ढिगार्‍यातून बाहेर काढला.तसेच अन्य जखमींची रवानगी काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवून दिला.सहा जखमींनाही अधिक उपचारांसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवण्यात आले आहे. एका खासगी कंत्राटदाराने हे बांधकाम घेतले होते.