Thu, Jun 20, 2019 00:34होमपेज › Goa › पीडीएतून गावे वगळण्यास सहा दिवसांची मुदत

पीडीएतून गावे वगळण्यास सहा दिवसांची मुदत

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:51PMपणजी: प्रतिनिधी

ग्रेटर  पणजी पीडीएतून  सांताक्रुझ व  सांतआंद्रे मतदारसंघातील गावे वगळल्याची अधिसूचना  येत्या सहा दिवसांत जारी करावी, अन्यथा 9 मेपासून   येथील आझाद मैदानावर   साखळी उपोषण  करू, असा इशारा  गोंयकार अगेन्स्ट पीडीएचे  आर्थुर डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत दिला. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी ही  पीडीएतून  सांताक्रुझ व  सांतआंद्रे मतदारसंघातील गावे वगळण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. आम्हाला  तोंडी आश्‍वासन नको, लेखी स्वरूपात अधिकृत  हवे,असेही त्यांनी सांगितले.

डिसोझा म्हणाले, ग्रेटर   पणजी पीडीए स्थापनेची अधिसूचना  डिसेंबर   2017 मध्ये जारी करण्यात आली होती. यात  सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील गावांचा तेथील ग्रामस्थांना विश्‍वासात न घेताच समावेश करण्यात आला. या निर्णयाला तेथील लोकांच्या होत असलेल्या विरोधानंतर नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी ही   गावे  पीडीएतून वगळण्यात येतील,असे आश्‍वासन दिले. मात्र प्रत्यक्षात अजूनही गावे  वगळल्याची अधिसूचना  जारी करण्याची प्रक्रिया  सुरू  झालेली नाही. 

मंत्री सरदेसाई यांनी यासाठी आवश्यक असलेली  नगरनियोजन मंडळाची बैठकही अद्याप बोलावलेली नाही,गावे वगळल्याची अधिसूचना  त्वरित जारी करावी. यासाठी त्यांना सहा दिवसांची मुदत  देत आहोत.  सरकारकडून या प्रश्‍नी केवळ  दिशाभूल  केली जात असल्याचाही  आरोप डिसोझा यांनी केला. रामा  काणकोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, रोशन  माथाईस, गोंयचो आवाज संघटनेचे   कॅप्टन फर्नांडिस व अन्य यावेळी उपस्थित होते. 

Tags :Goa, Six, days, exclude, villages, PDA