Sun, Jun 16, 2019 12:27
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › शिरोडा आयुर्वेद महाविद्यालयास मदत करणार

शिरोडा आयुर्वेद महाविद्यालयास मदत करणार

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 07 2018 11:27PMशिरोडा : वार्ताहर

भारतीय परंपरेत आयुर्वेद शास्त्राला फ ार महत्त्व आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी  आपली मदत असणार आहे, असे आश्‍वासन नगरनियोजनमंत्री  विजय सरदेसाई यांनी दिले. 

शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्राचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच रवींद्र भवन, मडगाव येथे उत्साहात झाले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई बोलत होते. त्यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

भारतीय संस्कृती प्रबोधिनीचे अध्यक्ष पांडुरंग घाटे यांनी महाविद्यालयाच्या 25 वर्षांच्या वाटचालीचे वर्णन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुरा बाळे यांनी महाविद्यायलाचा वार्षिक अहवाल वाचून दाखविला. 

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहल रेडकर, प्रणेता उसगावकर, रक्षंदा मुंगी व शिवानी डोग्रा यांनी केले. आभार सोहनी मयेकर यांनी मानले.