Wed, May 22, 2019 16:17होमपेज › Goa › मुरगावात आजपासून शिमगोत्सवाची धूम

मुरगावात आजपासून शिमगोत्सवाची धूम

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:09AMदाबोळी : प्रतिनिधी

मुरगाव नागरिक समिती आयोजित शिमगोत्सवाची धूम शुक्रवार दि. 2 मार्चपासून वास्कोचे ग्रामदैवत श्री दामोदरचरणी गुलाल उधळून सुरू होणार आहे. यावेळी दरबार बँडसह ऑर्केस्ट्राच्या गजरात धुलिवंदन मिरवणूक वास्को शहरातून निघणार आहे, अशी माहिती शेखर खडपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रम शैलेश गोवेकर, केतन ठक्‍कर, तारा केरकर, वामन चोडणकर, प्रताप राणे, विनोद किनळेकर, नंदा होन्‍नावरकर, चंद्रकांत मांज्रेकर, बाबू आरोलकर, दीपक धोंगे, अमय चोपडेकर, किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

शनिवार दि. 3 मार्च रोजी डान्स इंडिया डान्स विजेता संकेत गोवेकर याचा नृत्याचा कार्यक्रम मुरगाव नगरपालिका इमारतीसमोर उभारण्यात येणार्‍या खास रंगमंचावर होणार आहे. सदर कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

रविवार दि. 4 मार्च रोजी संध्या 7 वा. मदमस्त अप्सरा हा मराठी लावणीचा कार्यक्रम होईल. 5 मार्च रोजी संध्याकाळी मुंबई येथील कलाकारांचा ‘फ्यूजन द म्युझिकल नाईट’ हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सुरेखा कांबळी, प्रताप गावकर, शिवाजी सावंत, तुकाराम आर्लेकर, राजन केरकर, गोकुळदास च्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार आहे.

6 मार्च रोजी संध्याकाळी 7  वाजता गर्जा महाराष्ट्र हा मराठी वाद्यवृदांचा कार्यक्रम मनीष आरोलकर, प्रताप गावकर, प्रकाश गावस, विशाल सुर्लकर, विनायक धोंगे, उमेश साळगावकर, विजय नागवेकर, रुपेश वाडेकर, शिवप्रसाद महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणार आहे.

7 मार्च रोजी राज्य पुरस्कृत व मुरगाव नागरिक शिगमोत्सव समिती आयोजित ‘शिगमोत्सव चित्ररथ मिरवणूक’ दुपारी 4 वाजल्यापासून समिती अध्यक्ष शेखर खडपकर, प्रताप गावकर, प्रकाश गावस, मनीष आरोलकर, विशाल सुर्लकर, नंदादीप राऊत, रमा सोनुर्लेकर, उमेश साळगावकर, संतोष नाईक, दामू कोचरेकर, शैलेश गोवेकर, बाबूराव रेवणकर, विनायक धोंगे, तारा केरकर यांच्या मार्गदर्शनाखी होणार आहे.

गुरुवार दि. 9 मार्च रोजी संध्या. 7.30 वा.  ‘निघाली कॉमेडी एक्सप्रेस’ हा कार्यक्रम रवींद्र भवन बायणा वास्कोच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सादर केला जाईल. शिमगोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा. यंदाचा शिमगोत्सव ‘भगवा शिगमोत्सव’ या शिर्षकाखाली साजरा केला जाईल, असे अध्यक्ष शेखर खडपकर यांनी सांगितले.