Wed, Jul 17, 2019 10:00होमपेज › Goa › शॅक व्यावसायिकांची देशी पर्यटकांवर भिस्त  

शॅक व्यावसायिकांची देशी पर्यटकांवर भिस्त  

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 26 2017 1:09AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

‘ओखी’ चक्र्रीवादळातून सावरत असलेल्या शॅक व्यावसायिकांना सध्या देशी पर्यटकांचाच आधार आहे. राज्यात विदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्याने शॅक मालकांना देशी पर्यटकांवर निर्भर रहावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे शॅक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. समुद्रकिनारी असलेल्या शॅक्स उद्ध्वस्त झाल्या होत्या. परिणामी व्यावसायिकांना पुन्हा नव्याने गुंतवणूक करून शॅक्स उभारावे लागले. या सर्वांतून सावरत शॅक व्यावसायिकांनी पुन्हा आपल्या व्यवसायाला सुरुवात केली असून नववर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.

शॅक ओनर वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सांगितले की, शॅक व्यावसायिकांनी ओखी वादळात उद्ध्वस्त झालेल्या शॅकची पुनर्बांधणी केली आहे. सध्या शॅक व्यावसायिक पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक पर्यटक गोव्यात येतील, अशी अपेक्षा आहे.