Tue, Sep 25, 2018 07:26होमपेज › Goa › प्रेमातील शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे : HC 

'प्रेमातील शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नव्हे'

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : पुढारी ऑनलाईन 

कोणत्याही महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवल्यामुळे एखाद्या पुरूषाला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवता येणार नाही, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे. या दोघांमध्ये जर प्रेम संबंध असतील आणि त्यातून जर दोघांनी शारीरिक संबंध ठेवले असतील तर हा कोणत्याही प्रकाराचा बलात्कार मानला जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  

योगेश पालेकर नावाच्या एका व्यक्तीवर एका महिलेने लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या आरोपाखाली योगेशला ७ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१३मधील या प्रकरणावर निकाल देताना कोर्टाने आरोपीची शिक्षा आणि दंड रद्द केला. दोन व्यक्तींमध्ये प्रेम संबंधाचे सबळ पुरावे असल्याचे सिद्ध झाल्यास तथ्यांची चुकीची व्याख्या करून पुरुषाला बलात्काराचा आरोपी मानता येणार नाही, असे न्यायालयाने या सुनावणी दरम्यान सांगितले. 
३ ते ४ वेळा शारीरिक संबंध

योगेश गोव्यातील एका कॅसिनोमध्ये शेफचे काम करत होता. याच दरम्यान त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. योगेश मला घरातल्यांशी भेट घडवून आणण्यासाठी घेऊन गेला होता. योगेशच्या घरी एक रात्र ते थांबले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध बनले. त्यानंतर योगेशने त्या महिलेला घरी सोडले. या प्रकारानंतर ३ ते ४ वेळा या दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले. यानंतर या महिलेने योगेशच्या विरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती

संबंधित महिला योगेश पालेकर याला आर्थिक मदतही करत असल्याची माहिती सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आली. योगेशने लग्नाचे वचन दिले म्हणून त्यांच्यात शारीरिक संबंध बनले नाहीत तर त्या दोघांमध्ये सहमती होती म्हणूनच या प्रकरणाला बलात्कार म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Tags : Rape, Sexual Relations, Relations, Goa, High court


  •