Mon, Apr 22, 2019 16:08होमपेज › Goa › कळंगुटमध्ये सेक्स रॅकेटचा पदार्फाश 

कळंगुटमध्ये सेक्स रॅकेटचा पदार्फाश 

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:19AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी  

आगारवाडा कळंगुट येथे शनिवारी दुपारी पोलिसांनी सेक्स रॅकेट विरोधी केलेल्या कारवाईत दोन दलालांना अटक करून दोन तरुणींची सुटका केली. अटक केलेल्यांमध्ये फिरोज खान (वय 34, मुंबई) व विजय मदनपुरी (24, राजस्थान) यांचा  समावेश असून सुटका केलेल्या युवती दिल्ली व कोलकाता येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुणींना वेश्या व्यवसायासाठी आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी जीए-03-एबी-9115 व जीए -03-डी-7854 या दोन दुचाकी व सात मोबाईल व 15 हजार रुपयांची रोख रक्कम संशयितांकडून जप्त  केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जिवबा दळवी, उपनिरीक्षक विदेश पिळगावकर, सीताराम मळीक, करिष्मा परूळेकर, कॉन्स्टेबल संज्योत केरकर व लुईस परेरा यांच्या पथकाने केली.