Mon, Jul 13, 2020 17:33होमपेज › Goa › पणजीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पणजीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 12:31AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

परराज्यातील  मुलींना नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्याच्या  प्रकरणाचा कांपाल येथे पणजी पोलिसांनी सोमवारी (दि. 11) पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा दलालांना अटक करून एका युवतीची सुटका केली.

साधना देशमुख (अहमदनगर, महाराष्ट्र) व माणिक अथोटे (अमरावती, महाराष्ट्र) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दलालांची नावे आहेत. दोन्ही संशयित परराज्यातून मुलींना आणून त्यांना शरीर विक्रयासाठी  ग्राहकाला  सोपवून रात्रीसाठी 20 हजार रुपये घेत असत. हा सर्व व्यवहार हे दोन्ही दलाल  मोबाईलच्या माध्यमातून करायचे.