Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Goa › मडगावात सव्वा तीन लाखांचा विदेशी सिगारेट साठा जप्त 

मडगावात सव्वा तीन लाखांचा विदेशी सिगारेट साठा जप्त 

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:15AM

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

मडगाव पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात धाड घालून सुमारे सव्वा तीन लाख रूपये किंमतीची विदेशी सिगारेटच्या पाकिटांचा साठा आणि रिक्षा  जप्त करून  हिराराम उर्फ श्याम रावत (25) या तरूणाला बुधवारी ताब्यात घेतलेे.

मडगाव  पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रावत याच्याकडून (जी ए 08 यु 0906) ही पिकअप रिक्षा ताब्यात घेण्यात आली आहे. सदर रिक्षा कोस्ता फॅक्टरीच्या परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाड टाकली असता पिकअप रिक्षात तीन लाख, सोळा हजार रुपयांचे तंबाखूजन्य साहित्य आढळले.

सर्व सिगारेट विदेशी बनावटीची असून त्यात एस्लाईट चार कार्टन.एस मेन्थोलचे एक कार्टन, एल एन्ड फाईन एक कार्टन, गोल्डन व्हर्जिनिया टोबॅकोची 36 पाकिटे, बॉण्ड सुपर स्लिम सिगारेटची 25 पाकिटे, गुडम गरमची 28 पाकिटे जप्त करण्यात अली आहेत, असे नायक यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक अमीन नाईक आणि हरीश नाईक यांनी या कारवाईत सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले.